उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी फकिरा ब्रिगेडच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. आंदोलन सुरु असताना रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिकेला आंदोलकांनी तात्काळ मार्ग मोकळा करुन पुन्हा आंदोलन सुरू ठेवले, त्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांनी आंदोलकांचे आभार व्यक्तकेले.

 या आंदोलनात फकिरा ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे, नागिणी थोरात, मायावती सगट, राम गवळी, लखन गवळी, राम दंडगुले, बालाजी दंडगुले, दत्ता कांबळे, राधिका गवळी, काजल गवळी, मीराबाई गवळी, इंदाबी भालेराव, अनुसया गवळी, अंबुबाई ईटकर, चंद्रभागा गवळी यांच्यासह फकिरा ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


 
Top