उस्मानाबाद / प्रतिनिधी-
ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखाना आवारातील कार्बन बेरींगचे कव्हर, आरबीसी चैनच्या कड्या, लोखंडी नळाच्या मोटारीची कपलिंग व प्लेजेन्स तसेच बैलगाडीच्या चाकाचे दोन डिक्स असा एकुण अंदाजे 20,000 ₹ किंमतीचा साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. यावरुन कारखान्याचे पहारेकरी- सुनिल जनार्धन लंगडे यांच्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 250/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे.
तपासादरम्यान ढोकी पो.ठा. च्या सपोनि- श्री. जगदीश राऊत यांच्या पथकाने लागलीच गतीमान तपास करुन गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी पारधी पिढी येथील- बबलू हिराजी शिंदे, वय 19 वर्षे व तेर येथील- फरदीन आलिम शेख, वय 22 वर्षे या दोघांना ढोकी पारधी पिढी येथून ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीच्या साहित्यासह चोरी करण्यास वापरलेले ओमिनी वाहन जप्त केले आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- जगदीश राऊत यांसह पथकाने केली आहे.