तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील जळकोट येथे नॅशनल हायवे क्र.65 अर्धवट काम असुन ही टोली वसुली जोरात चालू आहे. त्यामुळे नॅशनल हायवेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दखल न दिल्यास शनिवारी दि.६ ऑगस्ट रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशरा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोक पाटील, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महेश कदम, ग्रा.प.सदस्य गजेंद्र पाटील, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुश लोखंडे, विश्वनाथ सुरवसे, बसवराज कवठे, अनिल छत्रे,हणमंत सुरवसे ,बाळसाहेब जाधव आदीच्या स्वाक्षऱ्यात आहेत.