उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद जिल्हा तालीम संघ व जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार सन्मानित जेष्ठ स्वातंत्र्य सौनिक क्रीडा महर्षी शिवाजीराव नलावडे स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान कुस्ती संकुल जिल्हा स्टेडीअम उस्मनाबाद येथे संपन्न झाला.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष श्री नानासाहेब पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त माजी जिल्हाधिकारी श्री. मधुसूदन साळवी, जेष्ठ शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख, नेत्रचिकित्सक इंग्लड कार्यरत डॉ. सचिन साळवी, कार्यक्रमाचे संयोजक श्री. संतोष शिवाजीराव नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व सत्कारमूर्ती व खेळाडूंचा सन्मानचित्र, मेडल, पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रम प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी यांनी क्रीडामहर्षी शिवाजीराव नलावडे यांचा कार्यगौरव केला व त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल गौरव करुन खेळाडूंना प्रेरणा दिली. क्रीडामहर्षी शिवाजीराव नलावडे यांच्या समवेत काम केलेले च्ॉलेंजर ग्रुपचे सहकारी माजी सौनिक, विविध संघटनेचे पदाधिकारी यांचा सन्मान करुन खेळाडूंना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास   नितीन तावडे, पौ. वामनराव गाते,  उदय काकडे,  बालाजी बनकर, राजेंद्र अत्रे  , डॉ. कुलदीप मिटकरी, डॉ. गजानन रा. परळीकर, प्रा. गजानन गवळी, प्रा. हुच्चे सर, अॅड. अविनाश नरसिंगराव देशमुख, श्री आण्णासाहेब जाधव, मा.श्री. दिलीपराव गणेश, श्री खरमाटे सर, श्री. गणेश सापते, श्री अंकुश पाटील, श्री गिरजाप्पा दहिहंडे,   राजकुमार दहिहंडे,   मन्मथआप्पा पाळणे, श्री सचिन शिंदे, धीरज गायकवाड, श्री. सिध्देश्वर बेलुरे सर, मा.श्री. भुजंगराव देशमुख  ,   प्रदिप भगवानराव साळुंके, पौ. दिनकर जाधवर, मेजर धनाजी जाधव, पौ. अनंत रावसाहेब केंद्रे या सर्वांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुर्यवंशी सर तर आभार गोडसे सर यांनी मानले.


 
Top