उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मौजे आळणी, (ता.धाराशिव ) येथील 31 वर्षीय तरुण शिवप्रेमी श्रीराम   फुगारे याने  आळणी येथून एकट्याने सायकलद्वारे सुरु केलेली भटकंती किल्ले प्रतापगड, महाड येथील चवदार तळे मार्गे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, रायगड ते पुणे, पुणे ते किल्ले राजगड, राजगड ते धर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ - वडू बुद्रुक, भीमा-कोरेगाव शौर्यस्थळ आणि तिथून परत मुळगाव आळणी असा जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास त्याने  पूर्ण केला.

 संततधार पाऊस, सह्याद्रीच्या अवजड घाटाची चढाई आणि दररोज अंदाजे 12 तास सायकलिंग करून किमान 100 किलोमीटर अंतर पार करत श्रीरामने वरील सर्व ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन आपले शिवप्रेम अधोरेखित केले त्याबद्दल त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.


 
Top