उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना नेते व ज्येष्ठ पत्रकार, राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने रविवार दि. ३१ जुलै रोजी छापा मारल्याच्या निषेधात आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईडीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. 

यावेळी शाम पवार, प्रा. दिलीप पाटील, सुधीर कदम याच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. माध्यमाशी बोलताना आमदार कैलास पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा हा गैर वापर असून खासदार संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे खासदार राऊत यांनी ईडीला तारीख वाढवून द्या, अशी मागणी केली होती. परंतू ईडी ने तारीख वाढवून न देता राऊत यांच्या घरावर छापा मारला.

 
Top