उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 2022-23 या शैक्षणिक वर्षापासुन विद्युत अभियांत्रिकी(इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग) या नवीन शाखेस शासनाची मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमास 60 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.  या पदविका( डिप्लोमा )अभ्यासक्रमामुळे विद्युत निर्मीती कंपन्या , महानिर्मिती , इलेक्ट्रकील दुचाकी आणि चारचाकी वाहन निर्मिती करणा-या कंपन्यातही विद्यार्थ्यांना नौकरीची संधी उपलब्ध होणार आहे. तेंव्हा इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे, आवाहन प्राचार्य एस. एल अंधारे यांनी केले आहे.

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रानिक्स टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर, अॅटोमोबाईल व ड्रेस डिझाईनिंग अॅण्ड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग हे अभ्यासक्रम पूर्वीपासुन उपलब्ध आहेत. तथापि इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग हा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्याची विनंती पालक आणि विद्यार्थी यांनी केली होती. त्यानुसार प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला होता. त्यानुसार या अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष 2022-23 पासऊन मान्यता देण्यात आली आहे

 
Top