उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषद उस्मानबाद अंतर्गत भविष्य निर्वाह निधी योजनेच्या (GPF) सदस्य असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची 2021-22 या अर्थिक वर्षातील मासिक कपात वर्गणीचे विवरणपत्र (स्लिप) वितरीत करण्यासाठी सर्व खाते प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख यांच्याकडून विहीत नमुन्यात मागणीपत्र मागविण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त मागणीपत्रानुसार मुख्यालय स्तरावरील कर्मचा-यांची विवरणपत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते नुकतेच वितरीत करण्यात आले.

 भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र (स्लिप) अद्यावत करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत मोरे आणि सहा. लेखाधिकारी शरद माळी, सतीष बनसोडे यांच्या नियंत्रणाखाली वित्त विभागातील  क.सहा. (लेखा) राहुल थापडे यांनी संगणकावर विवरणपत्र विहीत वेळेत अद्यावत करुन कर्मचा-यांना वितरणासाठी उपलब्ध करुन दिले आहे.ज्या कर्मचा-यांचे मागणीपत्र वित्त विभागाकडे पाठविण्यात आलेले नाहीत त्या कार्यालयांनी तात्काळ मागणीपत्र पाठविण्यात यावेत, असे आवाहन श्री. मोरे यांनी केले आहे.

 
Top