वाशी  / प्रतिनिधी-

जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद व मराठवाडा अपंग विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी तालुक्यातील विधवा, निराधार व बेरोजगार महिलांसाठी वाशी येथे मन्मथ स्वामी मठामधे तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे ही कार्यशाळा आजपासून तीन दिवस चालणार आहे. त्यामध्ये विधवा, निराधार, बेरोजगार महिलांना अनेक योजनांची माहिती देऊन त्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी कार्यशाळेमधे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आज दि 7 जुलै 2022 रोजी मन्मथ स्वामी मठ वाशी येथे करण्यात आले. 

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष मा. सोमनाथ लोखंडे तसेच वाशी पोलीस स्टेशन चे पो नी दळवी साहेब व नगरसेवक विकास पवार,  शिवशंकर चौधरी, नगरसेवक शिवहार स्वामी, अहमद काझी, जयपाल सुकाळे, संस्थेचे सचिव अर्जुन वायकर व रमेश बिरंगळ, अंकुश शेवाळे (महाराज) तसेच ऍड अश्विनी कुंभार मॅडम, जिल्हा उद्योग केंद्राचे गव्हाने साहेब,जिल्हा उद्योग केद्राच्या शिंदे मॅडम, शामल सांडसे आदी सहीत तालुक्यातील महीला व पुरुषांची  उपस्थिती होती. तरी तालुक्यातील महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष यांनी केले आहे

 
Top