उमरगा/ प्रतिनिधी

आषाढी एकादशी निमित्त इंडियन पब्लिक स्कूलच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल,  रुक्मिणी, वारकरी असे विविध वेशभूषा परिधान केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर व ज्ञानोबा - तुकाराम असा जयघोष केला.

रिमझिम पाऊस, टाळ - मृदंगाचा गजर, साड्या परिधान करून नटलेल्या मुलींच्या डोक्यावरील तुळस, पुढे पालखी व मध्येच उंचावणाऱ्या भगव्या पताका अशा वातावरणात दिंडी सोहळा उपस्थित नागरिकांनी अनुभवला. 

या दिंडी सोहळ्यात स्कूलच्या प्राचार्य रोहिणी प्रशांत कनशेट्टी, वीणा प्रवीण पावशेरे, मेघाली किशोर जगताप, आरती सचिन बिराजदार, प्रशांत कनशेट्टी आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा गोविंद नगर, मदनआनंद कॉलनी, चालुक्या कॉलनी, दत्ता मंदिर ते हिंगलज माता सभागृह गोविंद नगर गुंजोटी रोड असा पार पडला.

 
Top