उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आरोग्य विभागाकडून जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था,अधिकारी आणि कर्मचा-यांचे गुणगौरव, आशा पुरस्कार आणि फलॉरेंस नाईटिगेल पुरस्काराचे आयोजन जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले. यावेळी कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ग्रामीण भागातून कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ,मंगरुळ आणि शहरी भागातुन स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर  यांना प्रथम पुरस्कार तसेच इतर एकूण पाच पुरस्कार वितरीत करण्यात आले.

 यावेळी डॉ.सचिन बोडके, डॉ.रफीक अन्सारी, डॉ. मधुकर पांचाळ, डॉ. दिपक मेंढेकर, डॉ.स्मित गवळी, डॉ.विवेक होळे, डॉ. जी. आर. परळीकर, डॉ. किरण गरड, डॉ. उज्वला कळंबे, डॉ.आहेर, आर.जी.राठोड,जीवन कुलकर्णी, किशोर तांदळे, अशोक चव्हाण, हेमंत पवार, संतोष नलावडे, एन. एस. मोरे, एस. व्ही. हिंगमीरे, श्रीमती दराडे, श्रीमती सरवदे यासोबत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका आरोग्य अधिकारी, सर्व उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, सर्व गट प्रवृत्तक, सर्व आशा तसेच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रसुती करण-या  तुळ्जापूर तालुक्यातील अणदुर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरी भागातून उस्मानाबाद येथील  स्त्री रुग्णालय यांना प्रथम पुरस्कार तसेच इतर एकूण चार पुरस्कार देण्यात आले सर्वाधिक पी.पी.आय.यू.सी.डी. चे काम करणाऱ्या संस्था ग्रामीण भागातून प्रांडा तालुक्यातील शेळगाव प्रा.आ. केंद्र आणि शहरी भागातून स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर प्रथम पुरस्कार, तसेच इतर एकूण चार पुरस्कार देण्यात आले.सर्वाधिक इंजेक्शन अंतराचे काम करणाऱ्या संस्था ग्रामीण भागातून भूम तालुक्यातील अंभी प्रा. आ.केंद्र तसेच शहरी भागात कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयास  प्रथम पुरस्कार आणि इतर एकूण चार पुरस्कार देण्यात आले.

 कुटुंब कल्याण कार्याक्रमांतर्गत ग्रामीण भागातुन सर्वोत्कृष्ट उपकेंद्र तुळ्जापूर तालुक्यातील तामलवाडीला मिळाला तसेच इतर एकूण तीन पुरस्कार देण्यात आले.सर्वाधिक कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबाबत डॉ. एस. डी. बिराजदार, डॉ. दीपिका चिंचोले, डॉ. मिरा देशपांडे, डॉ.राहूल यंदे आणि डॉ. प्रविण खारे यांचा सर्वोत्कृष्ट सर्जन म्हणून पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

 कायाकल्प कार्यक्रमंतर्गत नाईचाकूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याचबरोबर फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारामध्ये घाटंग्री येथील सेविका सविता थोरात नागोराव यांना प्रथम पुरस्कार देवून गौरव करण्यात आले. आरोग्य गुणानुक्रमे सवोत्कृष्ट तालुका आरोग्य अधिकारी यामध्ये डॉ जहुर एन सय्यद यांना सर्वोत्कृष्ठ तालुका आरोग्य अधिकारी म्हणून गौरविण्यात आले नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम पारितोषीक देण्यात आले.आशा कार्यकर्ती पुरस्कार अंतर्गत जिल्हयातील एकूण 16 सर्वोत्कृष्ट आशांना विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार अश्विनी जनार्धन व्हरकट यांना आणि व्दितीय पुरस्कार इंदूबाई मोहन कबाडे यांना देण्यात आले.आशा कार्यकर्ती यांना नाविण्यपूर्ण पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार अणदूर येथील जयश्री शिवाजी तलवार यांना आणि व्दितीय पुरस्कार सलगरा येथील सारीका बाबूराव बचाटे यांना देण्यात आला.

  जिल्हास्तरीय गट प्रवृत्तक पुरस्कार यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील प्रा. आ. केंद्र कोन्ड येथील राणी दगडू इंगळे यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला, तसेच व्दितीय पुरस्कार प्रा. आ. केंद्र माकणी येथील राजश्री परमेश्वर साळुंके आणि संगीता महादेव क्षीरसागर यांना व्दितीय पुरस्कार विभागून देण्यात आले, तसेच सलगरा येथील सारीका परिक्षीत पवार यांना तृतीय पुरस्कार देवून गौरव करण्यात आले. इतर आशा कार्यकर्तीना एकुण 42 पुरस्कार देण्यात आले.

  या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी (प्र.)डॉ. शिवकूमार हालकूडे आणि जिल्हा शल्यचिकितस्क डॉ. धनंजय पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले तर जिल्हा समुह संघटक सतीश गिरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आरोग्य पर्यवेक्षिका मनिषा सुकाळे यांनी आभार मानले.

 
Top