उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर पत्र लेखन स्पर्धा “ ढाई आखर” शीर्षकाखाली आयोजित केली आहे. या पत्राचा विषय “Vision for India 2047” या विषयावर लिहावयाचे असून पत्र कोणत्याही भाषेमधून लिहिता येते. ही पत्र लेखन स्पर्धा वय वर्षे 18 पर्यंत एक गट व वय वर्षे 18 च्या वर दुसरा गट अशा दोन गटात विभागलेली आहे. म्हणून स्पर्धकानी दिनांक ०१ जानेवारी  २०२२ रोजी माझे वय 18 पेक्षा कमी  जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख करावा तसेच आपले नाव पत्ता व वयाचा उल्लेख असावा. पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी पी ओ, मुंबई ४००००१ यांच्या नावाने लिहून डाकघरामार्फत लावलेल्या विशेष टपाल पेटील टाकावयाचे आहे. पाकिटातून पत्र पाठवण्याची शब्द मर्यादा १००० व अंतर्देशीय पत्रासाठी ५०० शब्दाची आहे. पत्र पाठविण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोंबर २०२२ ही आहे. दि. ३१ ऑक्टोंबर २०२२ च्या नंतर पाठवलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेमध्ये समावेश करण्यात येणार नाही.

 राज्य स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे रु.२५०००/- रु.१००००/- व रु.५०००/- राज्य स्तरावर निवडलेल्या प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्राला राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येईल व राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे रु.५००००/-,रु.२५०००/-,रु.१००००/-चे पारितोषक देण्यात येईल.

       तरी  जास्तीत  जास्त  संख्येने  जनतेने  आपला  सहभाग  नोंदवावा  असे  आवाहन  येथील डाक अधिक्षक, डॉ.  बी. एच. नागरगोजे यांनी केले • आधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02382-249954 वर संपर्क साधावा.


 
Top