लोहारा/प्रतिनिधी

जागतिक सर्प दिनाचे   औचित्य साधून ऑर्गनाझेशन ऑफ बायोडाव्हर्सिटी अंझर्वेशन व निसर्ग संवर्धन संस्था लोहारा यांच्या माध्यमातून लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा, हायस्कुल लोहारा, वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालय व न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा शहराकडे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्ते मार्गावरती पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी व वन्यप्राण्यांना खाद्याची उपलब्धता होण्याच्या दृष्टिकोनातून कमी पाण्यावरती येणाऱ्या चिंच,जांभूळ व सीताफळ या फळ झाडांच्या बीजांचे रोपण  करण्यात आले. 

यावेळी प्रत्येक विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापर मुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी यशस्वी करण्यासाठी ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशन चे उपाध्यक्ष श्रीनिवास माळी, सचिव अभिजीत गायकवाड, सदस्य विरेश स्वामी, अमित बोराळे, शैलेश जट्टे, दीपक रोडगे, भागवत जवादे, शिक्षक व्ही.टी.कलमे, डी.व्ही.धनवडे, अंजली पटवारी, रत्नमाला पवार, यशवंत चंदनशिवे, राजकुमार वाघमारे, व्यंकट चिकटे, गोपाळ सुतार, एस एम पांचाळ, मुख्याध्यापक राठोड व मुख्याध्यापक शहाजी जाधव सर यांनी परिश्रम घेतले.


 
Top