उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कम्युनिटि पोलीसींग स्कीम अंतर्गत मुरुम पोलीस ठाण्याचे सपोनि- श्री.पवन इंगळे, उपविभागयी पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा येथील पिंक पथकाचे प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक- श्रीमती एस.पवार यांचेसह पोलीस पथकाने अचलेर, ता.लोहारा येथील विदया विकास हायस्कुल येथे भेट दिली. 

त्यावेळी शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना पोलीस काका, पोलीस दिदी, यांची ओळख करुन देवुन पोलीसांविषयी समज-गैरसमज, वाहतुकीचे नियम, बाललैंगिक अत्याचार, भारतीय दंड संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098 तसेच सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. सदर भेटी दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग व  250 विदयार्थी हजर होते.


 
Top