उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या शिंदे समर्थक गटाच्या कार्यकर्त्यांकडून  जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.  विशेष म्हणजे आजची नामांतरची घोषणा तीसऱ्या वेळी झाली आहे. ज्या-ज्यावेळेस घोषणा झाली आहे, त्या-त्यावेळी जल्लोष झाला आहे. त्यामुळे आज परत एकदा धाराशिव मध्ये जल्लोष करण्यात आला. 

  यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,  सुनील काकडे, लाटे सर, अभय इंगळे,   मुख्यमंत्री शिंदे गटाचे माजी उपनराध्यक्ष सूरज साळुंखे,  प्रणील रणखांब, योगेश तुपे, विलास लोकरे, सागर कदम,  गगन आगलावे, आकाश माळी, अविनाश टापरे, दिनेश तुपे, लखन झिरमिरे, विशाल हिंगमिरे, मयुर आडसुळ, नितीन देवकते, महेश मगर, अतुल टापरे, सागर कदम, बबलू वंडरे, बबलू नवले, राकेश ठवरे, नागेश थोरबोले, ललन पाटील  सुनिल काळे, आदित्य गवंडी, नागेश वर्‍हाडे,  गणेश चौधरी, सागर इरकर, ओंकार मैराण, गणेश जाधव, अंकुश मुळे, सचिन मडके, सुरज राऊत,रंजित चौधरी, सिद्धनाथ सावंत,अतुल इंगळे,महेश देवकाते, सचिन मडके,अक्षय देवकते, आकाश शेंडगे, खंडू मासाळ,सुमित गायकवाड, राकेश ठवरे,सिद्धनाथ सावंत, दिनेश तुपे, निखिल माने, दिनेश जाधव, आण्णा मगर, अमोल गायकवाड यांच्यासह शिंदे समर्थक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जनतेच्या मागणीचा सन्मान -नितीन काळे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवरील विश्वास दर्शक ठराव पास करून नियमानुसार औरंगाबाद नामातर छत्रपती संभाजीनगर व  उस्मानाबादचे धाराशिव केल्याबद्दल सर्व जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अल्पमतातील सरकार ने यापुर्वी नामांतर केले असले तरी त्याला कांही अर्थ नव्हता त्यामुळे बहुमत सिध्द करून सरकार ने शहराचे नामांतर करून जनतेच्या मागणीचा सन्मान केला, असे मत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केले. 


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुरा -उपनगराध्यक्ष सूरज साळुंके

यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुंके म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झाले आहे. उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे संभाजीनगर हे नामांतर करण्याचे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. बाळासाहेबांचे हे स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूर्ण करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली आहे. 

 

 
Top