उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील अल्पसंख्याक समाजातील 10वी 12वी तिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री अब्दुल जब्बार सगरे ( मिंयासहेब सेवा भावी संस्था संस्थापक अध्यक्ष), प्रमुख पाहुणे डॉ. इस्माईल कासम मुल्ला ( वर्ग 1 अधिकारी अरोग्य विभाग उस्मानाबाद), डॉ. सय्यद तब्बसुम सुलताना ( माजी मुख्याध्यापिका जि. प. कन्या प्रशाळा उस्मानाबाद), सय्यद मुजीब ( शम्स एज्युकेशन सोसायटी कोषाध्यक्ष), मुफ्ती रहेमतुल्लाह ( मोहतमीम मदरसा अहय्या उल उलुम), काझी रेश्मा ( मुख्याध्यापिका शम्स उल उलुम ऊर्दू हायस्कूल), सिद्दीकी मुबारेसोद्दीन ( सामाजिक कार्यकर्ते), शेख रियाज सर (प्रमुख अल कलम स्टडी सेंटर), यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्याक समाजातील 10वीत प्रथम क्रमांक पटकावणारी 96.40% घेणारी विद्यार्थीनी शेख सालिहा वहिद तसेच 12वीत प्रथम क्रमांक पटकावणारी 93.50% गुणांसह मोमीन जव्हेरीया मोहंमद फेरोज, सिद्दीकी शोयबा 95.1% गुणांसहित खेलो इंडिया रायफल शुटिंग राष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविल्या बद्दल विशेष सत्कार व यांच्या सहित 30 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार खिदमत ए खल्क फाऊंडेशन च्या वतीने डिक्शनरी, मेडल, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,

कार्यक्रमाची प्रस्तावना फॉन्डेशन चे अध्यक्ष शेख नुरोद्दिन इंजिनिअर तर सुत्र संचालन मौलाना शौकतअली तसेच अभार प्रदर्शन सचिव शेख जावेद यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख मैनुद्दीन,सरदार मुजावर, शेख वजिर, मोमीन फहीम, सय्यद जाकेर, सय्यद अजमत, सय्यद फजल, शेख हामीद यांनी परिश्रम घेतले.


 
Top