लोहारा/प्रतिनिधी

लोहारा पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम दि.28 जुलै रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. उ

पजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी आंधळे, तहसीलदार संतोष रुईकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्कृती जाधव या लहान मुलीच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण काढण्यात आले. लोहारा तालुक्यात पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. त्यापैकी धानुरी, हिप्परगा (रवा) हे दोन गण अनुसूचित जाती करिता तर आष्टाकासार, जेवळी हे गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. तसेच कानेगाव, माकणी, तोरंबा हे सर्वसाधारण व जेवळी (दक्षिण), सास्तुर, तावशिगड हे गण सर्वसाधारण महिलासाठी आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी आंधळे, तहसीलदार संतोष रुईकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील, सरपंच सागर पाटील, शिवराज चिनगुंडे, माजी जि.प. सदस्य गुंडू अण्णा भुजबळ, रब्बानी नळेगावे, धर्मवीर जाधव, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top