उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्वतंत्र ‘मराठवाडा राज्य’ निर्माण करा , अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

या संदर्भात पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा निजाम संस्थानातून संयुक्त महाराष्ट्रात विलीन झाला. मराठवाड्यातील जनतेच्या आशा  आकांक्षांना पालवी फुटली अन प्रत्येकाच्या मनात शैक्षणिक, सामाजिक ,आर्थिक ,सांस्कृतिक, राजकीयदृष्ट्या सर्व संपन्न होईल असे वाटले होते परंतु मराठवाड्यातील लोकांचा भ्रह्मनिरास झाला. त्यामुळे मराठवाडा विकसित करण्यासाठी गेलेले वैभव परत उभे करण्यासाठी व स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीसाठी येत्या विधिमंडळ अधिवेशनात ठराव मांडून मंजूर करून घ्यावा व तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवून देण्यासाठी मराठवाड्यातील सर्व आमदारांनी विधानसभेत प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारचे विधानसभेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे या ठरावास कुठेही आडकाठी येणार नाही असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांचे हस्ताक्षर आहे. 


 
Top