उस्मानाबाद / प्रतिनिधी-

हर घर तिरंगा या अभियानांतर्गत ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद च्या  उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील जिल्हास्तरिय विक्री केंद्र येथे एनकेपी ( NPK ) उत्पादक गट यांनी  उत्पादित केलेल्या राष्ट्रीय ध्वज  तिरंगा झेंडा स्टॉलचे उदघाटन  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांच्या हस्ते  आज करण्यात आले .                  

  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता , अप्पर जिल्हाधिकारी रुपाली  आवळे , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी ,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे   यांचीही   उपस्थिती होती .  यावेळी जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, अमोल सिरसट, समाधान जोगदंड, तालुका अभियान व्यवस्थापक पुजा घोगरे, तालुका व्यवस्थापक अभिजित पडवळ, नागेश काकडे, तसेच NPK उत्पादक गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

 
Top