उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हातील अवैध धंदयांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी उमरगा उपविभागात गस्तीस होते. दरम्यान सपोनि श्री शैलेश पवार यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली कि, मनोहरनगर, होळी तांडा ग्रामस्थ- दत्ता चव्हाण यांचे शेतात एका पत्राचे शेडमध्ये काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. यावर पथकाने त्या ठिकाणी   छापा टाकला असता तेथे 19 लोकांना तिर्रट जुगार खेळताना ताब्यात घेतले. त्यांचेकडे जुगाराबाबत विचारणा केली असता सदर पत्रा शेडचे मालक दत्ता चव्हाण हेच जुगाराचा अड्डा चालवित असल्याचे समजले. त्या ठिकाणाहून जुगाराचे साहित्यासह 05 मोटारसायकल, 01 कार, 17 भ्रमणध्वनी व 29,300 रु. रोख रक्कम असा एकुण 10,31,880 रु चा मुददेमाल पोलीसांनी जप्त केला असुन त्यांचेविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4,5 प्रमाणे लेाहारा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

   सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि- रामेश्वर खनाळ, सपोनि-  शैलेश पवार, पोहेकॉ- प्रकाश औताडे, जावेद काझी, हुसेन सय्य्द, मेहबुब अरब, धनंजय कवडे, पोना- शौकत पठाण, अमोल चव्हाण, अशोक ढगारे या पथकाने केली आहे

 
Top