परंडा  / प्रतिनिधी-

 जादा दराने धान्य खरेदी करतो, असे आमिष दाखवुन शेकडो शेतकऱ्यांचे ३ कोटी ४१ लाख ४२ हजार रुपयांचे धान्य खरेदी करून पैसे न देता फरार झालेला आरोपी संतोष रानमोडे यास बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस पथकाने परंडा पोलिसांच्या मदतीने बावची येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडील तब्बल ४२ लाख रुपयाची रोकड व कार जप्त केली. यातील आरोपीच्या विरोधात चिखली पोलिसात १६१ शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली असुन फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुलाडाण्याचे पथक

आरोपी फरार झाल्याने बुलडाण्याचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, उप विभागीय पोलिस आधिकारी सचिन कदम व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अशोक जायभाये, पीएसआय शारद डोईफोडे, हलवालदार रामेश्वर मुंढे, सरदार बेग यांचे पथक मुख्य आरोपी संतोष रानमोडे याचा शोध घेण्यासाठी परंडा येथे दाखल झाले होते. परंडा येथील पीआय सुनिल गिड्डे, बळीराम शिंदे , माहिला पो. ना. पायाळे, पोलिस हवलदार यादव यांच्या मदतीने आरोपीची गुप्त माहिती घेतली. 

 
Top