उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नगर परिषदेच्या प्रभागनिहाय मतदारयादीतील चुका दुरूस्त कराव्यात व वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करावीत, या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. १५) जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहराची प्रभागनिहाय प्रारूप व अंतिम मतदारयादी आयोगाकडे सादर केली आहे.या यादीत अनेक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. विधानसभा मतदारयादीत ज्यांची नावे होती. त्यांची नावे कोणतीही सबब न देता वगळण्यात आली आहेत. यामुळे हजारो मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार नाहीत. तुर्तास नप निवडणूक कार्यक्रम स्थगीत केला असला तरी आगामी काळात नप निवडणूक होणार आहे. त्यामुळे मतदार यादीतील चुका दुरूस्त कराव्यात, अशी मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अॅड. अजित खोत, महेबुब शेख, मोसीन मिर्झा, संजय दनाने, तानाजी पिंपळे, राहुल माकोडे, सी. जी. शेख, नामदेव वाघमारे यांची स्वाक्षरी आहे.


 
Top