उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यातील गुंजोटी येथिल सोन्या चांदीचें दुकान फोडून पावणे तीन लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१४) रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली.

चोरट्यांनी गुंजोटी येथील प्रदीप शेषेराव पाटील यांचे पाटील ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील सोने चांदीचे दागिने असलेले लॉकर उचलून घेऊन गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत मिळालेली अशी की,गुरुवारी रात्री पावणे एकच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी गुंजोटी येथील नदीजवळ असलेल्या प्रदीप शेषेराव पाटील यांच्या सोने, चांदीच्या दागिन्यांचे दुकानाची चोरी केली. या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात असलेल्या सोने चांदीच्या दागिन्यांचे लॉकर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग बॉक्स, डिश टीव्ही सेटअप बॉक्स लंपास केले आहे.  दुकानाच्या शटरचे आवाज येत असल्याने दुकानाच्या माघे राहणारे  लिंगदाळे यांनी दुकान जागेचे मालक सतीश माळगे यांना फोन करून याची कल्पना दिली सतीश माळगे यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसुरक्षा यंत्रणेचे रवी देशमुख यांना कळवले लागलीच रवी देशमुख यांनी ग्रामसुरक्षा कॉल यंत्रणेचा वापर करून गावातील नागरिकांना पाटील ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी फोडले असल्याने गावात चोर आल्याचे सांगत सावध राहावे असे आवाहन केले. काही वेळातच दुकान मालक व शेजारील नागरिक घटनास्थळी दाखल झाले मात्र चोरटे पसार झाले होते. गुंजोटी गावात दुकानदार व मेडिकल चालकांनी आपापल्या दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आल्याचे दिसत आहे. पुढील तपास गुंजोटी पोलीस स्टेशनचे बिट अंमलदार एन. बी. वाघमारे, कॉन्स्टेबल जे. बी. वाघूलकर करत आहेत.


 
Top