उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महिलांच्या प्रश्नाची तातडीने सोडवणूक होण्याच्या द्दष्टीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे दि.18 जुलै 2022 रोजी आयोजन करण्यात आला आहे.

 समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे  प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या  तक्रारींची शासकीय यंत्रणेकडून तात्काळ सोडवणूक व्हावी यासाठी महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो. या महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार सादर करताना ती वैयक्तिक स्वरूपाची असावी न्यायप्रविष्ठ प्रकरणे,सेवा विषयक,आस्थापना विषयक प्रकरणे आणि अपूर्ण अर्धवट माहिती असलेले अर्ज सादर करता येणार नाहीत.

 या महिला लोकशाही दिन दि.18 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयेाजित करण्यात आला असून गरजू महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व प्र.महिला व बालविकास अधिकारी एस.बी.शेळके यांनी केले आहे.

 
Top