उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) च्या येथील जिल्हा कार्यालय  मार्फत  2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावी, पदवी , पदव्युत्तर,वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये मातंग समाज तसेच तत्सम  12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील अशांना महामंडळाकडून ज्येष्ठता  आणि  गुणक्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

  स्व:हस्ताक्षरातील अर्ज मोबाईल नंबर सोबत, शाळा सोडल्याचे दाखला,गुणपत्रक,पुढील वर्षात प्रवेश घेतल्याबाबतचा पुरावा/पावती,आधार कार्ड,जातीचा दाखला इ.   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळ (मर्या.)डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तळमजला,उस्मानाबाद या कार्यालयात दि.22 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत आणून द्यावेत किंवा टपालाव्दारे पाठवून देण्यात यावेत तसेच उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.तरी उस्मानाबाद जिल्हयातील मांग,मातंग समाजातील आणि तत्सम 12 पोटजातीतील युवा/युवतीनी या सूवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एल.ए.क्षीसागर यांनी केले आहे.

 
Top