उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मराठवाडा शिक्षक संघाची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम स्काऊट गाईड कार्यालय, उस्मानाबाद येथे पार पडला आहे.तरी सर्व जिल्हा प्रतिनिधी, मराठवाडा शिक्षक संघ, सर्व सदस्य, पदाधिकारी, मराठवाडा शिक्षक संघावर प्रेम करणारे सर्वशिक्षक यांनी सर्वानुमते जिल्हा कार्यकारणी बिनविरोध निवडली आहे.
या कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष शेरखाने जे. एस,उपाध्यक्ष गायकवाड व्ही.बी, जिल्हासचिव मायाचारी व्ही एस, कार्याध्यक्ष भोसले डी. के,कोषाध्यक्ष बनसोडे डी. एम, सहसचिव बलसुरे डी. एन, प्रसिद्धी प्रमुख विभुते एस. एस,तर सदस्य म्हणून श्री माळी सी. एन, देडे जी. एच, डोळस डी. एस, डोडे एस. बी यांची निवड करण्यात आली.
सदरील बैठकीला मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष श्री पी. एस.घाडगे सर, माजी सरचिटणीस श्री व्ही.जी.पवारसर नुतन सरचिटणीस-राजकुमार कदम सर, बीड जिल्हाध्यक्ष तांदळे सर,चंदनशिवेसर,शिंदे सर,व केंद्र कार्यकारिणी सदस्य श्री औताडेसर,तीर्थकरसर,जमादारसर व मराठवाडा शिक्षक संघावर प्रेम करणारे शिक्षक उपस्थित होते.