उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील तावरजखेडा येथील शेतकरी संजय शामराव फेरे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मंगळवारी फेरे यांच्या कुटुंबीयास भेट देऊन सांत्वन केले. तसेच धीर देत आत्महत्याग्रस्त कुटुंबास आर्थिक सहाय्य केले.

यावेळी जिल्हा शिवसेना सदैव आपल्या कुटुंबीयांच्या समवेत असून आपल्यावर झालेल्या या आकस्मिक धक्क्यातून आपण सर्वांनी सावरावे अशी अशा व्यक्त केली. फेरे यांनी केलेली आत्महत्या ही नक्कीच एक दुःखद घटना आहे. परंतु कोणीही केलेल्या आत्महत्येमुळे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करत नसते. त्यामुळे आत्महत्या करण्यापेक्षा मला आणि घाडगे यांना आपल्या घरातला सदस्य समजून आपल्या समस्या सांगाव्या. त्यासोबतच आपल्या जवळच्या कुणालाही आपल्या समस्या बोलून दाखवण्याचेही राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय देसाई, माजी पंचायत समिती सदस्य अण्णा तनमोर, महेश पोतदार, तुकाराम फेरे, हनुमंत फेरे, समाधान फेरे यांच्यासह नागरिक आणि शेतकरी उपस्थित होते.

 
Top