उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांचे पुत्र राजेश नागदे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने कोल्हापुरात सोमवारी (दि.४) पहाटे निधन झाले. राजेश हे कुटुंबासह शनिवारी मुलीच्या शाळेतील पालक मिटिंगसाठी कोल्हापूरला गेले होते. मुक्कामी थांबलेल्या हॉटेलमध्येच पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव उस्मानाबादेत आणण्यात आले. संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरातील घराजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहकार, बँकिंग, सामाजिक, वारकरी संंप्रदाय क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती होती. राजेश नागदे यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.


 
Top