उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

 छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल, सांजा रोड, उस्मानाबाद येथील सुशांत प्रशांत कठारे या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी निवड झालेली आहे. यासोबतच महाराष्ट्र टॅलेंट सर्च (एम.टी.एस.) मध्ये सारोळा केंद्रात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सारोळा (बु.) केंद्राचे केंद्रप्रमुख राजाभाऊ गिरी सर, संस्थेचे अध्यक्ष बालाजी भोसले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरव सर यांनी केले.


 
Top