परंडा / प्रतिनिधी-

 गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती परंडा येथे गुरुवार दिनांक १३ रोजी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम(एलिम्को मुंबई), जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद, यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तीसाठी मोजमाप शिबिर संपन्न झाले.

     या शिबिरात दीपप्रज्वलन करून १५० दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून मोजमाप घेतले.पात्र लाभार्थ्यांना लवकरच आवशकतेनुसार सहाय्यक साधने ,श्रवणयंत्र, व्हीलचेअर,पांढरी काठी,तीन चाकी सायकल इ.मोफत देण्यात येणार आहे.अशी माहिती कमलेश यादव, (अलिम्को) यांनी दिली.

  यावेळी जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद चे वैद्याकिय सामाजिक विभाग चे कांबळे ,अलिमको चे गौरिष साळुंखे, सूरजन भालेराव,सूर्योदय दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पाडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राचे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी घोडके प्रदेशी उपाध्यक्ष अमोल शेळके परांडा शहराध्यक्ष गोरख देशमाने परंडा तालुका अध्यक्ष पांडुरंग मिसाळ परंडा तालुका समन्वयक दिव्यांग बारबोले ए.आर. मूकबधिर निवासी शाळेचे, शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सर व इतर शिक्षक वृंद व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिल्हाध्यक्ष तानाजी घोडके यांनी पुढाकार घेतला व तालुक्यातील गरजू दिव्यांगाला लाभ मिळवून दिला.

 
Top