परंडा / प्रतिनिधी-

प्रहार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा उस्मानाबाद च्या जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग पवार यांची  निवड करण्यात आली आहे.

पांडुरंग पवार हे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रूईभर ता.जि.उस्मानाबाद येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत,३० वर्षे सेवेचा अनुभव आणि विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून प्रामाणिकपणे कार्य करत आहेत.

  शिक्षकांचे व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी असलेली तळमळ, प्रामाणिकपणा, आपल्या कार्याप्रती एकनिष्ठा, परखडपणा नि स्पष्टोक्ती बाणा तसेच अन्यायाविरुद्ध निकराने लढण्याची भूमिका, सामाजिक बांधिलकी यांचा परिपोष या गुणांमुळेच त्यांची निवड प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने करण्यात आली.

जिल्हा उपाध्यक्षपदी निवडीचे नियुक्तीपत्र  राज्य प्रवक्ता दत्तात्रय पुरी यांचे हस्ते देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत हे ही उपस्थित होते. सार्थ निवडीबद्दल सर्व शिक्षकांमधून त्याचे कौतुक होते आहे.


 
Top