उस्मानाबाद / प्रतिनिधी                

 कृषी महाविद्यालय आळणी गडपाटी येथील सातव्या सत्रात प्रविष्ट विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2022 अंतर्गत मौजे वाणेवाडी तालुका उस्मानाबाद येथे खरीप शेतकरी मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले .सदरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री महेशकुमार तीर्थकर  व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विषय विशेषज्ञ डॉ.गणेश मंडलिक व डॉ.श्रीकृष्ण झगडे  हे लाभले.

शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी कृषी अधिक्षक महेश कुमार तीर्थकर यांनी शेतकऱ्यांना शेतीसंबंधी विविध शेतकरी कल्याण योजना तसेच सेंद्रिय शेती याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.तसेच विषय विशेषज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी सोयाबीन पिकांमधील कीड व रोग व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करून उत्पादनामध्ये भरघोस वाढ कशी करता येईल याचे काटेकोर नियोजन शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन केले. 

डॉ.गणेश मंडलिक  यांनी फळबाग लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना शस्त्रोक्त पद्धतीने  भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन फळबाग लागवड,योग्य वृक्षजातींची निवड तसेच त्याची बाजारपेठ याबद्दल शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये वानेवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री दीपक घेवारे यांनी वाणेवाडी येथील बहुतांश शेतकरी बांधवांनी केलेल्या रुंद सरी-वरंबा पद्धतीचे फायदे सर्वांना विश्लेषण करून सांगितले. कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पाटील के.एच. यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणात शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले . कार्यक्रमांमध्ये वाणेवाडी गावचे सरपंच जयश्री उंबरे, उपसरपंच गोविंद उंबरे, कृषी सहाय्यक वैभव लेनेकर, ग्रामसेवक ओमकार गिरी, पोलीस पाटील मनीषा प्रदीप घेवारे तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव यांची भरभरून उपस्थिती होती.

 महाविद्यालयाच्यावतीने कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा.शेटे डी एस , कार्यक्रमाधिकारी प्रा. सुमिता पाटील, प्रा.सतीश दळवे,प्रा.सुतार नंदकिशोर, प्रा. स्वप्नाली साबळे, प्रा.कानिफनाथ बुरगुटे ,प्रा. सुनील भालेकर,प्रा. परमेश्वर गायकवाड ,तसेच विषय मार्गदर्शकप्रा.गुरव प्रशांत,प्रा.रबाना पठाण,प्रा.अश्विनी वाकळे,प्रा.नागरगोजे विजय, प्रा.गारडी अक्षय, प्रा.सागर जगधाने,ग्रंथपाल अक्षय कांबळे, तसेच कृषिदूत व कृषिकन्या उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे समस्त प्राध्यापक वृंद , कार्यालय प्रमुख प्रा.हरी घाडगे, सुतार रामचंद्र ,गुलाब मुजावर ,कोरे मावशी व संदीप वीर यांचे मोलाचे सहकार्य लाभले .सूत्रसंचालन  अमृता निर्गुडे व अंकिता म्हेत्रे , प्रस्तावना पटेल निहाल तसेच आभार मुंडे स्वराज या विद्यार्थ्यांनी केले .


 
Top