उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाविद्यालयाने दिलेल्या ज्ञान शिदोरीचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी करियर घडवावे आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात आणखी भर घालावी अशी अपेक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी व्यक्त केली.

     (उस्मानाबाद) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील शैक्षणिक वर्ष 2021- 22 मध्ये पद्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा निरोप घेताना एक आठवण म्हणून दहा हजार रुपये किमतीची पुस्तके महाविद्यालयातील वाणिज्य विभागाला भेट देऊन एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख बोलत होते. महाविद्यालयातील वाणिज्य विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून नुकतेच या विभागाला पीएच.डी. संशोधन केंद्राची मान्यता मिळालेली आहे.या पुस्तकाच्या रूपाने या संशोधन केंद्राच्या माध्यमातून अनेक संशोधक,अभ्यासक हे वाणिज्य क्षेत्रामध्ये लौकिक प्राप्त करतील असा विश्वासही याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला. व सर्व विद्यार्थ्यांचे या अभिनव उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.

   यावेळी वाणिज्य विभागातील प्रा. नारायण सकटे, प्रा.बालाजी नगरे,डॉ अवधुत नवले, डॉ. अमर निंबाळकर, प्रा.सुप्रिया शेटे इ. गुरूदेव कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top