उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आंध्रप्रदेशातील श्रीशैल्यमच्या धर्तीवर किंवा त्यापेक्षाही वैशिष्ट्यपूर्ण असे महाराष्ट्र राज्यातील तुळजापूर तीर्थक्षेत्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहीले मंदिर उभारले जावे यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.अर्चनाताई अंबुरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देत मागणी केली आहे.

 जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई माने , शहराध्यक्ष ॲड. ज्योतीताई वाघे,जिल्हा सरचिटणीस लतिकाताई पेठे, भाजपा युवती मोर्चाच्या मराठवाडा उपाध्यक्षा ऍड.पुजाताई देडे, युवती सरचिटणीस देवकन्याताई गाडे इत्यादी महिला पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.


 
Top