तुळजापूर  / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेचे सांयकाळच्या भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या  अभिषेक पुजेस गुरुवार   पासुन  प्रारंभ झाला आहे.

  कोरोना संसर्गजन्य विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून श्री तुळजाभवानी मंदिर श्रीदेविजींचे दर्शनासाठी भाविकांना बंद करण्यात आलेले होते . तथापी , महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार दिनांक ०७ ऑक्टोंबर 2022 रोजीपासून श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे . 

 सध्या भाविकांचे गर्दीचे प्रमाणही कमी प्रमाणात असल्याने श्रीदेविजींचे सायंकाळचे अभिषेक पुजा दिनांक ०७/०७/२०२२ रोजीपासून दररोज सायंकाळी ०७:०० ते रात्री ० ९ : ०० या वेळेत मान्यता देण्यात येत आहे . अभिषेकावेळी भेसळ नसलेले दही व दुध ( प्रमाण पाव लिटर ) यांचा वापर करुन देऊळ कवायतमधील नियमांचे काटेकोरपणे पालन करीत अभिषेक पुजा कराव्यात अशा सुचना  विश्वस्त समितीने परिपत्रक ठरावाद्वारे दिलेल्या आहेत . सदर सायंकाळचे अभिषेक पुजेचे पास मंदिर संस्थानचे अधिकृत https://shrituljabhavani.org या संकेतस्थळावर दिनांक ०७/०७/२०२२ , दुपारी ०३:०० वाजेपासून ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या असून सर्व भाविक भक्तांनी सदर संकेतस्थळावरुन अभिषेक पुजा पासची ऑनलाईन नोंदणी करुन अभिषेक पुजेचा लाभ घ्यावा लागणार आहे.

 श्रीदेविजींचे सायंकाळ अभिषेक पुजेचे एकूण १७५ ऑनलाईन पास वितरीत करण्यात येणार असून एका पासची शुल्क रक्कम रुपये ५० / - अशी असून एका पासवर कमाल ०५ व्यक्तींना अभिषेक पुजेचा लाभ घेता येईल , याची सर्वांनी नोंद घ्यावी . तसेच सायंकाळचे श्रीदेविजींचे अभिषेक पुजेची व्यवस्था विधी व न्याय विभाग , पुरातत्व विभाग यांचेकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशांचे अनुपालन करणेचे अधिन राहुन तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात येत आहे , याची सर्वांनी नोंद घ्यावी .असे आवाहन  तहसीलदार तथा व्यवस्थापक ( प्रशासन ) , श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर यांनी केले आहे.

 अभिषेक पुजा सुरु करण्यासाठी आ. पाटील यांचा पाठपुरावा -   रोचकरी 


  तुळजाभवानी मातेचे  सायंकाळचे अभिषेक नियमित सुरू करावेत अशी मागणी होत होती. या मागणीचा विचार करून आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांनी मंदिर प्रशासनाची चर्चा करून भाविकांचा व पुजारी  बांधवांचा विचार करावा अशी मागणी उचलून धरली या मागणीस श्री तुळजाभवानी मंदिर संस्थाने मान्यता दिली व  गुरुवार दिनांक ७ जुलै पासून सायंकाळी ७:०० ते ९:०० या कालावधीत अभिषेक पूजा सुरू करण्यात आल्या  असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त सचिन रोचकरी यांनी एका पत्रकार द्वारे दिली आहे.


 
Top