उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ होत असलेल्या मात्र अद्याप केवायसी e-KYC (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत केवायसी ऑनलाईन करून घ्यावी.अन्यथा केवायसी अभावी या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागू शकते असे आवाहन पीएम किसान योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम मे 2022 पर्यंत राबविण्यात आली.या मोहिमेस दि.31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.मात्र अद्यापही जिल्हयातील 41 टक्के लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फॉर्मर कॉर्नर (farmer corner) या टॅब मध्ये किंवा पीएम किसान ॲपमध्ये ओटीपी व्दारे लाभार्थींना स्वत: केवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल.ग्राहक सेवा केंद्रा वर 15 रुपयांच्या नाममात्र शुल्कात केवायसी बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल असे आवाहनही श्री. स्वामी यांनी केले आहे.


 
Top