उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यातील आजचा सत्तेचा आणि राजकारणाचा घोडेबाजार पाहता बप्पांची राजकारणातील तत्व मूल्य आणि निष्ठा आपल्या सर्वांनी सदैव लक्षात घेण्याची गरज आहे. बप्पांचे तत्वनिष्ठ राजकारणातील मूल्य अमूल्य होती. १९४४ साली स्थापन झालेला शेकाप पक्ष बप्पांनी तळागाळात रुजविला आणि वाढविला. परंतु कधीच कोणत्या आमिषाला न बळी पडता आपली राजकारणातील तत्त्व मूल्य जपली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या राज्यातील सत्तेच्या या घोडेबाजारामध्ये मला माझे मित्र आमदार श्री. कैलास पाटील यांचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांचे आजोबा आदरणीय बप्पांचा राजकीय आणि संस्कारांचा वारसा आमदार साहेबांनी तंतोतंत पाळत कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्षनिष्ठा बाळगली आणि शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले, असे प्रतिपादन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर आज शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार कैलास दादा घाडगे - पाटील यांचे आजोबा, शिक्षणमहर्षी आदरणीय स्व.भाई बळवंतराव बप्पा घोगरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमास खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह जिल्हाप्रमुख तथा आमदार   कैलास दादा घाडगे - पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार ओमराजे बोलत होते. 

   याप्रसंगी श्री. शहाजी भीमराव पडवळ, ॲड. अविनाश देशमुख, संस्थेचे अध्यक्ष  प्रभाकर आबा घोगरे, उपाध्यक्ष   महादेव बापू गवाड, सचिव   अरुण बापू घोगरे,   भागवत भाऊ घोगरे, मुख्याध्यापक   रमाकांत उजनकर सर,   दौलतराव माने,  विलास बाप्पा पडवळ, खेडचे सरपंच  सुनील नाना गरड,   अल्लाउद्दीन शेख गुरुजी, श्री. आबासाहेब खोत, शिवसेना शाखा प्रमुख सत्यजित पडवळ, राजाभाऊ पडवळ,  रामराजे पाटील, यांच्यासह नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top