नळदुर्ग / प्रतिनिधी-

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने दि.५ जुलै रोजी नळदुर्ग शहरात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तुळजापुर तालुक्याचे तहसिलदार सौदागर तांदळे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या ४१ वृक्षांची लागवड करण्यात आली. 

यावेळी माजी नगरसेवक शहेबाज काझी उदय जगदाळे, बसवराज धरणे,विनायक अहंकारी सुधीर हजारे, भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, भाजपाचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अजहर जहागिरदार सागर हजारे, बंडप्पा कसेकर, शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड,सतीश पुदाले,गणेश मोरडे,रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे,पत्रकार शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे, भगवंत सुरवसे, आयुब शेख, दादासाहेब बनसोडे आदीजन उपस्थित होते.      यावेळी  तहसिलदार सौदागर तांदळे , माजी नगरसेवक शहेबाज काझी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले.  सुत्रसंचलन व आभार पत्रकार तानाजी जाधव यांनी मानले.

      यावेळी समितीच्या वतीने शहरांतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा एकुण ४१ वृक्षांची लागवड करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समितीचे उपाध्यक्ष गजानन हळदे, पद्माकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, सुहास येडगे, प्रभाकर घोडके, विलास येडगे, अमर भाळे,महेश घोडके, मारुती घोडके यांच्यासह इतर सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.


 
Top