उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय येथे कै. वसंतराव नाईक यांची १०९ वी जयंती साजरी करण्यात आली.

 यावेळी जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे अध्यक्ष डॉ. बी. जे. पवार, उपआयुक्त श्रीमती गाडे आणि सचिव संतोष नाईकवाडी, आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे  एल.ए क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्ही. एन. मोहरकर , दै.विकासधारा चे संपादक बाबासाहेब अंधारे, डॉ. एस. बी. कटके, चंद्रकांत झोंबाडे, अनामिक सरवदे, मधुसुदन दिलीप माने व इतर कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक जिल्हा व्यवस्थापक पी.एम.झोंबाडे यांनी केले आणि महामंडळाच्या योजनांविषयी माहिती सांगितली.


 
Top