उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री. जयलक्ष्मी शुगर प्रॉडक्ट प्रा.लि. नितळीचे कार्यकारी संचालक यांच्याकडून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार येणे असलेल्या  तीन कोटी 40 लाख 69 लाख 20 हजार रुपये रकमेची वसुली करण्याच्या अनुषंगाने मौजे नितळी येथील कारखान्याचा 2021-2022 मध्ये गाळपाच्या या कारखान्याकडे शिल्लक असलेले मोलॅसिस (मळी) जप्त करण्यात आली आहे.या मोलॅसिसची विक्री जाहीर लिलावाव्दारे करण्यात येणार आहे.

 12 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता जय लक्ष्मी शुगर प्रोडक्ट प्रा. लि. नितळी येथे मळीचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्त मळीचे 3314.11 मे. टन आहे. टी. आर. एस आणि मळीचा ग्रेड 59.42 B HEAVY Grade II आहे. दर प्रती मे. टन 10हजार रु. असून एकूण रक्कम तीन कोटी 31 लाख 41 हजार शंभर आहे. उक्त जप्त करण्यात आलेल्या मोलॅसिसच्या विक्री संबंधी जाहीर प्रगटन www.osmanabad.gov.in या साईट वर प्रसिध्दी देण्यात आली आहे. या प्रसिध्दीमध्ये लिलावातील सर्व अटी व शर्ती यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे,असे उस्मानाबदचे तहसीलदार गणेश माळी यांनी कळविले आहे.

 
Top