उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हयात आहे.जिल्हयामध्ये प्रक्रीया उद्योग करण्यास मोठया प्रमाणात वाव आहे. तसेच जिल्हयातील उद्योजक,शेतकरी,महिला,महिला बचत गट, शेतकरी गट इत्यादींनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेचा लाभ मोठया प्रमाणात घ्यावा. असे आवाहन  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी अर्ज स्वत: अथवा संसाधन व्यक्ती यांच्या मदतीने https://pmfme.mofpi.gov.in/ संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा.  

 
Top