उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेनेच्या धाराशिव उपतालुका प्रमुखपदी चिलवडी ग्रामपंचायतचे सदस्य सौदागर जगताप यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश   राजेनिंबाळकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास   पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी ही निवड केली आहे.

 धाराशिव येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास (दादा) पाटील, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांच्या हस्ते धाराशिव उपतालुकाप्रमुख (वडगाव सि., अंबेजवळगे विभाग) पदी निवडीचे पत्र सौदागर जगताप यांना देण्यात आले.

 यापूर्वी शिवसेना विभागप्रमुख पदावर काम करताना सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबर शिवसेना पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष संघटन मजबूत करण्यासह पक्षाचे काम मोठ्या धडाडीने जगताप यांनी केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

 यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास दादा पाटील, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, धाराशिव नगरपालिकाचे नगरसेवक सोमनाथ गुरव शिव अल्पसंख्याक चे जिल्हाप्रमुख  अमीर शेख  विभागप्रमुख श्री मुकेश पाटील अमोल मूळे व्यंकट गुंड गणप्रमुख नेताजी गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top