उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केाहिजन फाउंडेशन ट्रस्टचे वतीने तुळजापुर तालुक्यातील तिर्थ खुर्द यागावी जलशुध्दीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्मार्ट शाळा पाहणी व शालेय परीसरात वृक्षारोपण  असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन   पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमास पोलीस उपविभागीय अधिकारी  डॉ.सई भोरे पाटिल, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे, कोहिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक दयानंद वाघमारे, उमेदचे तालुका व्यवस्थापक दत्तात्रय शेरखाने, गावचे सरपंच व ग्रामस्थ तसेच जिल्हा परीषद शाळेतील शिक्षक व विदयार्थी हे उपस्थित होते.   

 ावेळी कार्यक्रमाची उपस्थितांनी वृक्षारोपनापणाने सुरवात करुन जलशुध्दीकरण केंद्राचे उदघाटन मा. पोलीस अधीक्षक यांचे हस्ते करण्यात आहे. अध्य्‍क्षीय भाषणात मा. पोलीस अधीक्षकांनी  समस्त गा्रमस्थांना पर्यावरण संवर्धन हि काळाजी गरज असुन यासाठी जनसहभाग महत्त्वाचा असल्याचे पटवुन दिले.तसेच सामाजिक कार्यात उस्मानाबाद पोलीस दल कोठेच मागे राहणार नाही असा विश्वास हि व्यकत्‍ केला आहे. नागरीकांना काही अडअडचणी असल्यास डायल 112 या सेवेचा उपयोग करावा असेहि आवाहन केले आहे.


 
Top