तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले बजरंग बी  सरपाळे यांना बसमध्ये अचानक हदयविकाराचा झटका आल्याने त्यात त्यांचे  निधन झाले.ही दुर्घटना तुळजापूर धुळे बस मध्ये  रविवार दि.१८ रोजी सकाळी ८ वा. तुळजापूर बसस्थानकात घडली.

 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. कै. बजरंग सरपाळे यांनी  मौजे इटकळ येथे ही पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून काम केले आहे.वर्षभरा पूर्वीच त्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळाली होती. 


 
Top