तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तिर्थक्षेञ तुळजापूरच्या राजकारणाचा केंद्र बिंदू असलेल्या श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाची   वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि.७रोजी सकाळी  पुजारी मंडळ मंगल कार्यालयात शांततेत संपन्न झाली. या सभेत श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष निवडणुक बिनविरोध होईल अशी शक्यता होती माञ काही  इछुकांनी  आपल्याला अध्यक्षपद हवे असा पाविञा घेतल्याने  अध्यक्षपदाची निवडणुक  झाली नाही.

अध्यक्ष सज्जन सांळुके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत प्रथमता  मागिल सभेचा वृत्तात वाचून कायम करण्यात आला. नंतर कोषाध्यक्ष बाबासाहेब क्षिरसागर यांनी . सन २०२०-२०२१ व . २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांच्या जमा - खर्च मांडला त्यास मान्यता मिळताच   सन २०२२-२०२३ च्या अंदाज पत्रकावर चर्चा करण्यात आली.  प्रारंभी प्रास्तविक सहसचिव   नागेश सांळुके यांनी केले तर आभार उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी मानले.  या सर्वसाधारण सभेस संचालक पुजारीवृंद मोठ्या संखेने उपस्थितीत होते

 अध्यक्षपद बिनविरोध निवडीसाठी रविवार पर्यंत मुदतवाढ  !

 श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष पदासाठी पंधरा इच्छुकांचे अर्ज दाखल झाले होते. सर्वसाधारण सभेनंतर  मात्र ,    इच्छुकांना एकञित बसवुन अध्यक्षपद बिनविरोध  निवडीसाठी बैठक घेण्यात आली. माञ काही इच्छुकांनी अध्यक्षपद हवेच हा पाविञा घेतल्याने ही बैठक अयशस्वी झाली व रविवारी पर्यत बिनविरोध निवडीसाठी  प्रयत्न करावेत असे या बैठकीत निर्णय घेण्यात आला.


 
Top