उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

घाटंग्री येथील प्राथमिक, माध्यमिक , व उच्च.माध्यमिक आश्रम शाळेचे संस्थापक व अध्यक्ष  गुलाबराव जाधव  यांचा  वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीरात 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

यामध्ये शिक्षक,गाव व तांड्यातील नागरिक व कॉलेजचे विद्यार्थी यांनी रक्तदान केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश,शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  इंगळे एस.जी.व श्रीम.कुलकर्णी ए. एस. यांनी केले .तर आभार  आमलपुरे यांनी मानले. यावेळी गावचे सरपंच रणजित शिंदे,उपसरपंच सचिन जाधव ,मुख्याध्यापक  माने प्रशांत,जाधव सतीश सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक,पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते


 
Top