उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापन शास्त्र विभाग आयोजित “विद्यापीठ उप-परिसर आपल्या भेटीला” उपक्रमा अंतर्गत   विद्यापीठाचे  कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांची मुलाखत आयोजित केली गेली. या मुलाखती दरम्यान कुलगुरू डॉ. येवले यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास व विद्यापीठाचे कार्य ऊलघडले. मुलाखती मधून त्यांनी ग्रामीण भागातून स्वताची सुरुवात,त्यानंतर शिक्षणाची निर्माण झालेली आवड, कार्पोरेट मधील फार्मसीच्या संधी उपलब्ध असताना निवडलेले शिक्षण क्षेत्र, वर्धा येथील महाविद्यालातून सुरवात व राष्ट्रीय मानांकन संबंधित महाविद्यालयास प्राप्त करून दिले, तेव्हा पासून सुरु झालेला प्रवास, नंतर विद्यापीठ क्षेत्रातील मोठ मोठ्या जबाबदारी वरती कामे केली आणि आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करत आहेत.  सुरवातीच्या काळात विद्यापीठाचा पूर्ण अभ्यास करून आपण काय काय बदल करू शकतो हे ठरवले व टप्प्या टप्प्याने बदल घडवले. फाईल ट्रॅकिंग सिस्टम, लिव्ह व्यस्थापन, २ कोव्हीड प्रयोगशाळा आसे विविध नवीन प्रयोग केले. मराठवाड्यातील विद्यार्थ्यात मोठी क्षमता आहे त्याचा उपयोग विद्यार्थ्याच्या जडण घड्नेत करणे विद्यापीठाचे काम आहे. विद्यापीठातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रशासन व प्राधिकरण हे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत याचा मला आनंद आहे असे संबोधले.

 विद्यापीठातील सेवा सुविधा, संशोधन, कार्य, निर्णय, अभ्यासक्रम, प्रकल्प व शैक्षणिक बाबी समाजापर्यंत घेऊन जाने गरजेचे आहे. यु. जी. सी. देखील अपेक्षा करत आहे कि “विद्यार्थी विद्यापीठापर्यंत येण्याची वाट पाहण्या पेक्षा, विद्यापीठ समाज व विद्यार्थ्या पर्यंत घेऊन गेले पाहिजे म्हणजे शिक्षणाचा ओढा व संशोधनाची आवड निर्माण होईल. नवीन शैक्षणिक धोरणा नुसार आपल्याला काही बदल स्वीकारावे लागतील त्या साठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी तयार राहायला हवे. विद्यापीठ उप-परिसर उस्मानाबाद येथील उपलब्ध सेवा सुविधा, विभाग, संशोधन हे सर्व उस्मानाबाद परिसराच्या व मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासात मोठा हातभार लावणारे आहे. जास्तीत जास्त सेवा उप-परिसर उस्मानाबाद येथे पुढील काळात देखील सुरु केल्या जातील. वाढलेले नवीन विभाग हे उस्मानाबाद परिसरात नवीन संधी निर्माण करत आहेत. नाट्य व लोककला विभागाचा विशेष उल्लेख केला गेला. हि मुलाखत डॉ. विक्रम शिंदे यांनी घेतली आणि सदर मुलाखत फेसबुक लाईव्ह माध्यमातून घेण्यात आली,  तसेच याची लिंक विद्यापीठाच्या वेबसाईट वरती देखील उपलब्ध आहे.

 या मुलाखतीच्या वेळेस विद्यापीठ उप-परिसराचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. संजय मामा निंबाळकर उपस्थित होते. मा. कुलगुरू यांनी  “विद्यापीठ उप-परिसर आपल्या भेटीला” या उपक्रमाच्या संकल्पना व आयोजना बद्दल व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. विक्रम शिंदे, प्रा. सचिन बस्सैये व प्रा. वरून कळसे यांचे अभिनंदन केले. मुलाखती नंतर  मुलाखती दरम्यान आठवनीचा क्षण म्हणून फोटो फ्रेम देखील मा. कुलगुरू यांना देण्यात आली. या भेटी दरम्यान विद्यापीठ उप परिसरातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व उपस्थित होते.

 

 
Top