परंडा / प्रतिनिधी-

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुनील नाना शिंदे यांची नात कुमारी अन्विता  संजय बुटे हिने नुकतेच बेळगाव कर्नाटक  येथे आयोजित केलेल्या रोलर स्केटिंग प्रकारात सहभाग घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रम नोदवला .

       कुमारी अन्विता संजय कुठे ही केवळ अकरा वर्षाची असून तिने सलग ९६ तास ऑटो फॉर्मेशन रोलर स्केटिंग क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता . रोलर स्केटिंग करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुवर्ण अक्षरात आपले नाव नोंदविले .या प्रतियोगीते करिता देश-विदेशातून १०३९ स्केटिंग खेळाडू सहभागी झाले होते .त्यामध्ये तीने  आपले नाव सुवर्णाक्षरात नोंदवून आई-वडिलांचे आजी-आजोबांचे नाव जगभर केले आहे.तिच्या या यशामुळे आई वडिल सौ संजना संजय बुटे ,आजी आजोबा सौ सौ सुलक्षणा सुनील शिंदे  ,तसेच श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर , शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे , माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील , आमदार सुजितसिंह ठाकूर , जिल्हा परिषद सभापती  दत्ता अण्णा साळुंके , डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ जयसिंगराव देशमुख , विद्यापीठाचे माजी डीन तथा  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  उपकेंद्र उस्मानाबाद येथील  संचालक  प्राचार्य डॉ अशोक दादा मोहेकर , फुले-आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे  ,महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख , वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे , गगन शिंदे ,श्रीमती पद्मा शिंदे , ऐश्वर्या शिंदे , यांच्यासह अनेक मान्यवरांनी कुमारी अन्विता  हिचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 
Top