तेर/ प्रतिनिधी-

नागरिकांनी आँनलाईन फसवणुकीपासून  सतर्क राहून पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी एम.रमेश यांनी केले आहे

 तेर व परीसरातील पोलीस पाटील , ग्रामसुरक्षा दलातील युवक यांची गोरोबा काकांच्या समाधी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या  बैठकीत एम.रमेश बोलत होते .यावेळी तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी ,उपसरपंच रवीराज चौगुले , ढोकी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.जगदीश राऊत , पो.उ.नि.भागवत गाडे  यांची प्रमुख उपस्थिती होती .

काही फायनान्स कंपन्या लाँटरी लागली आहे , पाँलीसी  बंद पडली आहे असे विविध प्रकारचे कारणे सांगून  खाते नंबर , आधारकार्ड नंबरची मागणी करतात त्यामुळे आपली आर्थिक  फसवणूक होऊ शकते. यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगून आर्थिक फसवणुकीपासून दूर रहाण्यासाठी नागरिकांना सावधगिरी बाळगणे  गरजेचे असल्याचे सांगितले .रस्त्यावर ,काँलनीत  कोणतीही संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी. गावात होणारी  घरफोडी, दरोडे टाळण्यासाठी ग्रामसुरक्षा दलातील युवकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन रमेश यांनी  केले .यावेळी ग्रामसुरक्षा दलातील तरूणांना  संरक्षीत साहित्याचे कीटचे  वाटप करण्यात आले .यावेळी वाणेवाडीचे  पोलीस पाटील प्रदीप घेवारे , तेरच्या पोलिस पाटील फातेमा मनियार, बीट अमंलदार  प्रकाश तरटे , पो.ना .गोविंद खोकले , पो.ना .श्रीमंत क्षिरसागर  यांची उपस्थिती होती .

 
Top