उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार अतुल कुलकर्णी यांनी नुकताच स्वीकारला आहे. नव्याने रुजू झाल्यानंतर नूतन पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी यांचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग व मुस्लीम बांधवांच्या वतीने आज (दि.14) स्वागत व सत्कार करण्यात आला.  

पोलीस मुख्यालयात झालेल्या या सत्कार समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सत्कार समारंभानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थिती व त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, आयाज शेख, असदखान पठाण, अन्वर शेख, समियोद्दीन मशायक, अफरोज पीरजादे, वाजीद पठाण, इस्माईल शेख, अन्सार रजवी, इम्तियाज बागवान, साबेर शेख गुड्डू शेख आदीसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top